मी कविता भोसले. ज्ञानरचनावादाचा सर्वात व्यावहारिक दरवाजा म्हणजे पूर्वज्ञान. खाली सात तंत्रे — मी वापरलेली, मुलांनी आवडलेली.
- एक शब्द, दहा कल्पना: फळ्यावर विषय-शब्द, मुले स्लेटवर ३ शब्द.
- हो/नाही/माहित नाही: तीन कोपऱ्यांत उभे राहणे — हालचाल + मत.
- चित्र पहिले, पाठ नंतर: आकृती/छायाचित्र दाखवून अंदाज.
- चुकीचे विधान: “पृथ्वी सपाट आहे” सारखे — वाद मग सत्य.
- जोडीत ९० सेकंद: शेजाऱ्याला सांगा तुम्हाला काय माहित.
- कालचा अनुभव: “तुम्ही कधी … अनुभवले?”
- KWL तक्ता: माहित / जाणून घ्यायचे / शिकलो (शेवटी).
अनुभव: “चुकीचे विधान” तंत्राने वर्ग जागा झाला, पण कधी गोंधळही. नियम हवा — आदराने वाद. टायमर ठेवा. पूर्वज्ञान ५–७ मिनिटांत संपवा, नाहीतर धडा बुडतो.
तंत्रे छोटी असली तरी फरक मोठा. एक तंत्र तीन दिवस वापरा, मग दुसरे. सगळे एकदम नको.
‘हो/नाही/माहित नाही’ कोपरे — मुलांना खूप आवडते! …
चुकीचे विधान विज्ञानात खूप चालते. ‘हवा वजनहीन’ —…
इंग्रजी व्याकरणातही चुकीचे वाक्य देऊन सुधारणा कर…
तुमचे अनुभव वाचून तंत्रांची यादी वाढेल. KWL शेवट…