शिक्षक म्हणून सर्वात मोठा अडथळा हा नसतो की “AI नाही”, तर “काय टाइप करायचे ते कळत नाही”. मी कविता भोसले. खाली काही प्रॉम्प्ट आहेत जे मी स्वतः वापरते. थेट कॉपी करा, नंतर तुमची इयत्ता/विषय बदला.
अ) धडा नियोजन
तू महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेतील अनुभवी शिक्षक आहेस. इयत्ता ___, विषय ___, धडा/घटक ___. कालावधी ३५ मिनिटे. विद्यार्थी संख्या सुमारे ___. साधने: फळा, खडू, काही चित्रपत्रे (स्मार्ट टीव्ही असूही शकतो/नसूही शकतो). मराठीत दे: १) दोन स्पष्ट अध्ययन निष्पत्ती २) पूर्वज्ञान जोडणी ३) तीन उपक्रम (सोपा-मध्यम-आव्हानात्मक) ४) दोन मौखिक तपासणी प्रश्न ५) चार गृहपाठ प्रश्न ६) सामान्य चुका व उपाय. शहरी उदाहरणे टाळ, ग्रामीण/निमशहरी संदर्भ वापर.
ब) रुब्रिक + अभिप्राय
इयत्ता ___ च्या ___ असाइनमेंटसाठी ४ निकषांची रुब्रिक तयार कर (४-३-२-१). प्रत्येक निकषासाठी मराठीत विद्यार्थ्याला समजेल असे वर्णन. त्यानंतर तीन नमुन्यात्मक अभिप्राय दे: उत्तम / ठीक / सुधारणा आवश्यक — प्रोत्साहक भाषेत, टीका नव्हे मार्गदर्शन.
क) पालक संवाद पत्र
पालकांना पाठवायचे छोटे पत्र लिही: विषय ___ , आदरयुक्त मराठी, १२० शब्दांच्या आत, काय मदत हवी ते स्पष्ट, दोषारोप नको, ठोस सूचना ३.
ड) विशेष गरजा / समावेश
वाचन मंद गतीने करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हा पाठ सोपा कर: मुख्य कल्पना ५ वाक्यांत, शब्दार्थ यादी, दोन चित्र-आधारित प्रश्न, एक जोडी-कार्य. विद्यार्थ्याचे नाव वापरू नकोस.
इ) “उत्तर तपास” प्रॉम्प्ट
खालील प्रश्न व उत्तर तपास. चूक असेल तर योग्य उत्तर व एका वाक्यात कारण सांग. गणित पावले दाखव. शेवटी शिक्षकाने वर्गात विचारायचा एक प्रश्न सुचव.
प्रॉम्प्ट सुधारण्याची छोटी कला
- भूमिका द्या (“तू अनुभवी शिक्षक आहेस”)
- संदर्भ द्या (इयत्ता, वेळ, साधने)
- मर्यादा द्या (“१२० शब्दांत”, “मराठीत”, “ग्रामीण उदाहरण”)
- रूप सांगा (यादी / तक्ता / पायऱ्या)
- नंतर दुसऱ्या संदेशात म्हणा: “हे जास्त अवघड आहे, एक पायरी सोपे कर”
प्रॉम्प्ट बँक ही सुरवात आहे. तुमचा उत्तम प्रॉम्प्ट हाच असेल जो तुमच्या मुलांसाठी काम करेल. चांगले प्रॉम्प्ट येथे कमेंटमध्ये शेअर करा — आम्ही संग्रह वाढवू.
प्रॉम्प्ट बँक ही सर्वात गरजेची गोष्ट होती. मी धड…
रमेशसरांचे निरीक्षण महत्त्वाचे — AI ला भूगोल/स्थ…
रुब्रिक प्रॉम्प्ट मी आजच वापरला. चार निकषांमुळे …
प्रिया, उत्तम सूचना. प्रॉम्प्टमध्ये ‘प्रत्येक अभ…
पालक पत्र प्रॉम्प्ट खूप उपयोगी. आधी मी कठोर भाषा…